Skip to main content

Posts

माझ्या वाचनात आलेलं, आणि लिहिलेलं...

मुलीचा बाप...

"मुलीचा बाप...!" ‘बाप..!’ आजपर्यंत खुप लेखकांनी, कवींनी, कथाकारांनी, वक्त्यांनी, महत्म्यांनी, आणि संतांनी सुद्धा अगदी सुमधुर आणि तितक्याच तळमळीने आप-आपल्या शब्दात ‘बाप’ रेखाटला आहे. एखाद्या कुटूंबाला जितकी आईच्या मायेची, प्रेमाची, वात्सल्याची गरज असते, तितकंच महत्वाचं असतं त्या घरामधलं बापाच अस्तित्व. ज्याच्यामुळे त्या घराला घरपण असते, ज्याच्यावर त्या पूर्ण कुटूंबाची जबाबदारी असते, आणि ज्याच्यामूळे त्या पूर्ण कुटूंबाकडे वाईट नजरेणं बघण्याची कुणाची हिंमतही नसते. बाप रेखाटायचा झाला तर प्रकाशझोतात येतं, ते त्याचं धैर्य, समजुतदारपणा, आधार, कुटूंबाविषयीची त्याची तळमळ, प्रत्येकाविषयीची असणारी जाणीव, आणि आपल्यासाठीचा त्याग, हो; तो सर्वस्वी त्याग सुद्धा.  असाच एक बाप नुकताच मला पहायला मिळाला आणि तोच तुम्हाला थोडा सांगावासा सुद्धा वाटला. परवाच माझ्या एका भावाला लग्नासाठी पहायला पाहुणे आले होते. आलेल्या सात-आठ पाहूण्यांमध्ये मला सहजच ओळखला तो म्हणजे त्या मूलीचा बाप (अगदी मी माझ्या मनामध्ये रेखाटला होता तसा). कसा होता ना तो बाप? आपल्या लाडलीच्या लग्नाची काळजी लागलेला तो मूलीचा बाप...

Latest Posts

शेवटी शेवटी खूप आल्या सरी... वैभव जोशी.

मी कोण आहे? माझी ओळख काय??

आयुष्याला द्यावे उत्तर… विंदा करंदीकर.

माझ्या डायरी मधून… मला आवडलेलं, आणि मी लिहिलेलं असं काही.