मी कोण आहे? माझी ओळख काय??
मी कोण आहे? माझी ओळख काय??
हा प्रश्न बऱ्याच लेखकांना कवींना आजपर्यंत कित्येकदा पडला आहे.
मी काय घेऊन आलो होतो, जे इथं माझा आहे?
आणि बराच विचार केल्यानंतर मला एक उत्तर सापडलं...,
"श्वास...!"
जो आजही चालू आहे, जो आजही मी अखंडितपणे घेतोय.
आजही मला प्रश्न पडतो की, या सभोवताच्या वातावरण मध्ये दिसत नाही पण असणारा, म्हणजेच असणारा पण न दिसणारा ऑक्सिजन मला मिळतो कसा??
"मी माझ्या स्वबळावर जगतोय!!" असं म्हणणारा माणूस ऑक्सीजन घेण्यासाठी काय कष्ट करतो हो?
ऑक्सीजन आपल्याला कुठून शोधून आणावा लागतो का??
देव करो आणि हा श्वास कधी न थांबो!
पण हा श्वास थांबला तर??
मग प्रश्न पडतील...
आपण श्वास घेतला नाही म्हणून श्वास थांबला का?
श्वास थांबला म्हणून आपण थांबलो का?
अरे आपण थांबलो म्हणून जग थांबेल का?
अरे हे जग तर आपण थांबलोय म्हणून कधी थांबेल का??
बरं हा विचार करण्यासाठी, या प्रश्नाच्या घोळक्यात सापडण्यासाठी आपण असेन का??
मग हा श्वास थांबला तर आपल्याला सणावरती चढवणारे सुद्धा आपलेच असतात...!
आत्ता आठवण झाली समर्थांच्या त्या ओवीची...
मरे एक त्याचा | दुजा शोक वाहे |
अकस्मात तो ही | पुढे जात आहे ||
आणि म्हणूनच विचार करतोय,
मी काय घेऊन आलोय जे इथं माझं आहे?
इथं काय आहे जे माझं आहे?
मी काय घेऊन जाईन जे माझं असेल?
मी गेल्यानंतर इथं माझं असं काय राहणार आहे??
कदाचित उरेल तो हाच;
ज्याला आयुष्यभर कधी मी पाहिलं सुद्धा नाही...
तोच माझा घ्यायचा राहीलेला, चुकलेला,
तोच, श्वास...!!
- Rohit D. Mane.
Comments
Post a Comment