मुलीचा बाप...
‘बाप..!’
आजपर्यंत खुप लेखकांनी, कवींनी, कथाकारांनी, वक्त्यांनी, महत्म्यांनी, आणि संतांनी सुद्धा अगदी सुमधुर आणि तितक्याच तळमळीने आप-आपल्या शब्दात ‘बाप’ रेखाटला आहे. एखाद्या कुटूंबाला जितकी आईच्या मायेची, प्रेमाची, वात्सल्याची गरज असते, तितकंच महत्वाचं असतं त्या घरामधलं बापाच अस्तित्व. ज्याच्यामुळे त्या घराला घरपण असते, ज्याच्यावर त्या पूर्ण कुटूंबाची जबाबदारी असते, आणि ज्याच्यामूळे त्या पूर्ण कुटूंबाकडे वाईट नजरेणं बघण्याची कुणाची हिंमतही नसते. बाप रेखाटायचा झाला तर प्रकाशझोतात येतं, ते त्याचं धैर्य, समजुतदारपणा, आधार, कुटूंबाविषयीची त्याची तळमळ, प्रत्येकाविषयीची असणारी जाणीव, आणि आपल्यासाठीचा त्याग, हो; तो सर्वस्वी त्याग सुद्धा.
असाच एक बाप नुकताच मला पहायला मिळाला आणि तोच तुम्हाला थोडा सांगावासा सुद्धा वाटला.
परवाच माझ्या एका भावाला लग्नासाठी पहायला पाहुणे आले होते. आलेल्या सात-आठ पाहूण्यांमध्ये मला सहजच ओळखला तो म्हणजे त्या मूलीचा बाप (अगदी मी माझ्या मनामध्ये रेखाटला होता तसा). कसा होता ना तो बाप? आपल्या लाडलीच्या लग्नाची काळजी लागलेला तो मूलीचा बाप...
किती धन्यअसतो ना तो मूलीचा बाप, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या चिऊला अगदी मनावर दगड ठेवून हसत-हसतच शाश्रू नयनांनी निरोप देणारा, जिला पैशाची चनचन सोसूनसुद्धा शिकवलं तिला फद्याच्या वेळी दूसला
पाणी, कांदेपोहे, चहा, चर्चा, पसंत-नापसंत, मग देण्या-घेण्याची बोलणी, नात्यांची ओळख, पाहुण्यांची जुळवाजुळव, सभोवतालची परिस्थीती, इकडचं-तिकडचं राजकारण आणी त्या रंगलेल्या गप्पा, या सर्वांपासुन वेगळा. तिथंच असणारा पण वेगळ्याच काळजीरूपी विचारात गुंतलेला, तो. त्याला असते ना इतर चर्चेची गत, ना त्या गप्पांची रंगत, ना इतर कश्याचीच किंमत. असते ती मुलाकडील प्रत्येक पाहुण्यांची आगत, आणी त्या लग्नाच्या व्यवहाराची सुसंगत. त्याला असते ती फक्त आणि फक्त आपल्या मूलीच्या भविष्याची काळजी.
मग आलेल्या पहुण्यांमध्ये तो मूलीचा बाप असतो तरी कसा??
हो..;
तोच तो, ज्याच्या चेहयावर इतर सर्वांप्रमाणे हास्य तर आसतं, मत्र त्या हास्यामध्ये असतो तो नातं जुळल्याचा आनंद, आणि त्यापेक्षाही जास्त आपल्या चिमुकलिचं आपल्यापासुन दूर जाण्याचं लपवलेलं थोदं जास्त्च ते दू:ख.
तोच तो, जो लग्नाच्या जमवाजमवीमद्ध्ये सर्वांशी ताठ मानेने नाही तर अगदी नम्रतेने वागत असतो.
तोच तो, जो येणार्या-जाणार्या सर्वांना हात जोडून, आदबीने; अगदी कमरेत थोडा वाकुनच नमस्कार करत असतो.
तोच तो, जो इतर गप्पांमध्ये रमत नाही तर आपल्या मूलीच्या हितास्तव मूलाच्या बाजूचे काही चांगले ऐकण्यासाठी आसूसलेला असतो.
तोच तो, जो त्या रंगलेल्या गप्पांमध्ये सुद्धा अगदी शांत-शांत असतो, कधी-कधी तर अपमाणित होऊनही आपल्या चिमूकलीसाठी सर्वकाही ऐकून घेत असतो.
तोच तो, जो प्रत्येकाशी आदराने बोलत असतो, आणि प्रत्येक शब्द अगदी दहा वेळा विचार करूनच मांडत असतो.
तोच तो, ज्याला त्या गप्पांशी आपल्या मूलीच्या हिताशिवाय काहीही घेणं-देणं नसतं.
तोच तो, जो बैठकितील सर्वजण हसत असतानाही, आपल्या मूलीच्या होणार्या घराची काळजीपूर्वक पाहणी करत असतो.
तोच तो, जो पाहूण्यांमधल्या प्रत्येकाची आपल्या मूलीच्या भविष्यास्तव मनापासून काळ्जी घेत असतो, त्यांना हवं-नको ते सर्वकाही काळजीपूर्वक जाणुन घेत असतो.
तोच तो, जो होणार्या जावयाची समोरा-समोर प्रत्यक्ष बोलून नाही; तर इतरांकडूनच कसून चौकशी करत असतो.
तोच तो, ज्याची मान; त्या कणखर नजरे बरोबरच सार्या बैठकिमद्धे, आपल्या मूलीस्तव थोडी झूकलेली असते.
तोच तो, ज्याच्या चेहर्यावरचे शब्द नसलेले भाव खूप काही बोलत असतात, आणि त्याला पडलेले प्रश्न आवजाशिवायच तिथं खूप-खूप दंगा घालत असतात.
तोच तो, जो इतरांबरोबरच आपल्या मूलीच्या आवडीचाही विचार करत असतो.
तोच तो, ज्याच्या डोळ्यात लग्न जमल्यानंतरही लाख-लाख आनंदाश्रू दाटलेले असतात.
तोच तो, जो न बोलताही तिथूनंच आपल्या लाडलीला सांगत असतो; शतश: आशीर्वाद देत असतो, सुखी रहा.., सुखी रहा...
तोच तो,
“मूलीचा बाप...!!!”

Comments
Post a Comment