शेवटी शेवटी खूप आल्या सरी... वैभव जोशी.
"शेवटी-शेवटी..." (...गझल...)
- वैभव जोशी.
शेवटी शेवटी खूप आल्या सरी
चातकासारखा जन्म गेल्यावरी ||
स्तुत्य होते तरी सत्य आहे कटू
प्रेम केलेस तू जन्म गेल्यावरी ||
काळजाने चुकविलेसम पुन्हा
मिटलेसारखी वाजली बासरी ||
फार जखमा दिल्या सोबतीने तुझ्या
अन दुरावा अता घालतो फुंकरी ||
एवढा शांत दिसतो जरी आरसा
आत आहे सुरु चेंगरा-चेंगरी ||
माणसा पाहता दोन जाती तुझ्या
एक मारेकरी एक वाटेकरी ||
जन्म ही आपुला मरण ही आपुले
या घरातून मी चाललो त्या घरी ||
•••
Comments
Post a Comment